Isaiah 51:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन, जे तुम्हाला म्हणाले, ‘भूमीवर पडा, म्हणजे आम्ही तुमच्यावरून चालत जाऊ.’ आणि तुम्ही तुमची पाठ जमिनीसारखी केली, जणू रस्ताच, ज्यावरून चालत जावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता आम्ही तुझ्यावरून चालावे म्हणून आडवा पड, असे जे तुझे पीडणारे तुझ्या जीवाला म्हणाले आहेत, त्यांच्या हाती मी तो ठेवीन, आणि चालणाऱ्यांसाठी तू आपले शरीर भूमीप्रमाणे, रस्त्याप्रमाणे टाकून ठेवले आहे.