Isaiah 52:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांना धक्का बसला. त्याला इतकी दुखापत झाली होती की मनुष्य म्हणून त्याला ओळखणे त्यांना शक्य नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते— त्याचे स्वरूप मनुष्यप्राण्याच्या पलीकडे विद्रुप करण्यात आले होते आणि त्याचा आकार मानवसदृश्य राहिला नव्हता—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. त्याचे रुप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रुप दुसऱ्या मनुष्यांपेक्षा फार वेगळे होते.