Isaiah 52:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील. तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेच्या ओसाड स्थळांनो, आनंदाने एकत्र गायन करीत सुटा, कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरूशलेमेला खंडूण घेतले आहे.