Isaiah 54:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “एकवेळ डोंगर नाहीसे होतील, टेकड्यांचे रूपांतर धुळीत होईल. पण माझी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही. मी स्थापन केलेली शांती चिरंतन राहील.” तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरच हे सगळे सांगत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण पर्वत हलतील व टेकड्या काढून टाकल्या जातील, परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,” असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील, तरी माझा कराराचा विश्वासूपणा तुझ्यापासून दूर होणार नाहीत किंवा माझ्या शांतीचा करार ढळणार नाही, असे तुझ्यावर दया करणारा परमेश्वर म्हणतो.