Isaiah 54:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
घाबरू नकोस. तुझी निराशा होणार नाही. लोक तुझी निंदा करणार नाहीत. तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही. तू तरूण असताना तुला लज्जित व्हावे लागले. पण आता तू ते विसरशील. पती गेल्यावर तुझी झालेली अप्रतिष्ठा तुला आठवणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही. अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही. तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस; तू आपल्या तरुणपणाची लाज आणि आपल्या त्यागण्याची बदनामी विसरशील.