Isaiah 55:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता, काही राष्ट्रे कोठे आहेत हे तुम्हाला माहीत नाही. पण त्यांची आणि तुमची भेट होईल. त्या राष्ट्रांना, तुम्ही माहीत नाही. पण ती राष्ट्रे तुमच्याकडे धाव घेतील. परमेश्वराची, तुमच्या देवाची इच्छा असल्यामुळे हे असे घडून येईल. इस्राएलचा पवित्र देव तुमचा आदर करीत असल्याने हे असे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निश्चितच ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्रांना बोलवाल, आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशी राष्ट्रे तुमच्याकडे पळत येतील, कारण याहवेह, तुमचे परमेश्वर, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुम्हाला गौरवाने संपन्न केले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेतील. कारण परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील.