Isaiah 56:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. इस्राएलच्या लोकांना सक्तीने त्यांचा देश सोडावा लागला. पण परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्र गोळा करील. परमेश्वर म्हणतो, “मी ह्या लोकांना गोळा करून एकत्र करीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे इस्राएलच्या निर्वासित झालेल्यांना एकत्र करतात, ते सार्वभौम याहवेह अशी घोषणा करतात— “ज्यांना पूर्वी एकत्र करण्यात आले आहे, त्या लोकांशिवाय इतर लोकांनाही मी त्यांच्यात गोळा करेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.