Isaiah 57:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली. पण तुम्ही कधीच दमला नाहीत. तुम्हाला या गोष्टींमुळे आनंद मिळत असल्याने तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस, तरी “आपण आता हात टेकले” असे तू म्हणाली नाहीस; तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ स्वतःला नव्या बलाने संचारित केले, म्हणून तू मूर्छित झाली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.” आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.