Isaiah 57:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो: “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.