Isaiah 57:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नदीतल्या गुळगुळीत गोट्यांची पूजा करायला तुम्हाला आवडते. त्यांची पूजा करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर मद्य ओतता, त्यांना बळी अर्पण करता. पण तुम्हाला त्या दगडांशिवाय काही मिळत नाही. ह्यामुळे मला आनंद होतो असे तुम्हाला वाटते का? नाही. मला ह्यामुळे अजिबात आनंद होत नाही. प्रत्येक टेकडीवर व उंच डोंगरावर तुम्ही तुमचे अंथरूण तयार करता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओढ्यातले गुळगुळीत गोटे हाच तुझा वाटा; हाच तुझा भाग; त्यांनाच तू पेयार्पणे व अन्नार्पणे वाहिलीस. असल्या गोष्टी होत असता मला समाधान वाटेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; खरोखर, हाच तुझा भाग आहे. होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते आणि अन्नार्पणे करते. हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत. तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का?