Isaiah 57:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तुम्ही त्या अंथरूणात शिरता आणि त्या खोट्या देवांवर प्रेम करता. अशाप्रकारे वागणे हे माझ्याविरूध्द आहे. असे वागून तुम्ही पापे करता. तुम्ही त्या देवांवर प्रेम करता. त्यांची नग्न शरीरे पाहायला तुम्हाला आवडते. प्रथम तुम्ही माझ्याबरोबर होता. पण त्यांच्यासाठी तुम्ही मला सोडले. माझी आठवण तुम्हाला करून देणाऱ्या वस्तू तुम्ही लपवून ठेवता. तुम्ही अशा वस्तू दारामागे वा दाराच्या खांबामागे लपवून ठेवता व मग त्या खोट्या देवांकडे जाऊन त्यांच्याबरोबर करार करता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपले स्मारकचिन्ह दरवाजांच्या आड व खांबाच्या आड ठेवले; मला सोडून दुसर्‍यांपुढे तू आपली काया उघडी केलीस; चढून वर गेलीस; तू आपली खाट रुंद केलीस; तू त्यांच्याशी ठराव केलास; त्यांचा संग तुला आवडला; तू शरीरपूजा केलीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले, तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले. तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस.