Isaiah 58:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा. थांबू नका. रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा. लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा. याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका. रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा. माझ्या लोकांची बंडखोरी आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव.