Isaiah 58:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल, पीडितांच्या गरजांचा पुरवठा कराल, तर तुमचा प्रकाश अंधारातून झळकेल आणि तुमची रात्र मध्यान्हासारखी उजळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तू भुकेल्यांना मदत केली आणि दुःखी लोकांची गरज पूर्ण केली, तेव्हा तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल, आणि तुझा अंधकार मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपेल.