Isaiah 58:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. परमेश्वरानेच हे सर्व सांगितले असल्यामुळे हे सर्व घडून येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन; आणि तुझा पिता याकोब ह्याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन; परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तू परमेश्वराच्या समक्ष आनंद पावशील, आणि मी तुला पृथ्वीच्या उच्च ठिकाणी चालवेन; आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हास देईल, कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे.