Isaiah 58:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“या प्रकारचा उपवास मी निवडलेला नाही, दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे व पीडितांना मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे हाच मी निवडलेला उपास नाही काय?