Isaiah 58:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय व निराश्रितांना आश्रय द्यावा— जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.”