Isaiah 59:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत. आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो. दिवसासुध्दा आम्ही पाहू शकत नाही. दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो, दृष्टिहीनांप्रमाणे स्पर्शाद्वारे मार्ग चाचपडतो. मध्यान्हात आम्ही संधिप्रकाशात असल्याप्रमाणे अडखळतो; बलवानांमध्ये आम्ही मेलेल्यांसारखे असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दूपारी पडतो; बलवानांमध्ये आम्ही मरण पावलेल्या मनुष्यांप्रमाणे आहोत.