Isaiah 59:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही पाप केले आणि परमेश्वराविरूध्द गेलो. आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आमी त्याला सोडले. आम्ही देवाच्याविरूध्द दुष्ट बेत केले. आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही बंड केले, परमेश्वरास नकारले आणि आमच्या देवाला अनुसरण्याचे सोडून दूर फिरलो आहे. आम्ही खंडणी बद्दल बोललो आणि बाजूला वळलो आहो, वाईट गोष्टींचा विचार केला व मनात दुष्ट बेत केले.