Isaiah 59:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
विषारी सर्पाच्या अंड्यातून विषारी सर्पच निघतो. तसेच ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाचे अंडे तुम्ही खाल्ले तर तुम्ही मराल आणि ते तुम्ही फोडले तर त्यातून सर्पच निघेल. लोक खोट्या गोष्टी सांगतात-ह्या खोट्या गोष्टी कोळंयाच्या जाळ्याप्रमाणे असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते नागाची अंडी उबवतात, कातिणीचे जाळे विणतात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.