Isaiah 59:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना शांतीचा मार्ग माहीत नसतो. त्यांच्या जीवनात अजिबात चांगुलपणा नसतो. त्यांचे मार्ग प्रामाणिक नसतात त्याच्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कोणालाही कधीही जीवनात शांतता लाभणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही; त्यांच्या मार्गात न्याय नाही; ते आपणांसाठी वाकडे मार्ग करतात; त्या मार्गांनी चालणार्या कोणालाही शांती ठाऊक नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही; त्यांच्या वाटेवर न्याय नसतो. त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत; त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना शांतीचा मार्ग माहित नाही, आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही. त्यांनी कुटिल मार्ग स्थापिले, आणि जो कोणी या मार्गात प्रवास करतो तो शांतता ओळखत नाही.