Isaiah 6:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये, आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.”