Isaiah 6:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी, तो पुन्हा उद्ध्वस्त होईल. परंतु जसे एला आणि अल्लोन जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो, त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे दहा टक्के जरी उरले तरी पुन्हा ते नगर नाश होईल.” तरी एला किंवा अल्लोन ही झाडे तोडल्यावर त्यांचा बुंधा राहतो त्याच्या बुंध्यात पवित्र बीज आहे.