Isaiah 60:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील, राजे तुझी सेवा करतील “मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले. पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील, राजे तुझी सेवा करतील. जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले, तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”