Isaiah 60:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लबानोनमधील मौल्यवान चिजा तुला दिल्या जातील. लोक सुरू देवदारू आणि भद्रदारू तुला आणून देतील. माझे पवित्र स्थान सुंदर करण्यासाठी या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जाईल. ही जागा म्हणजे जणू काही माझ्या सिंहासनासमोरील चौरंग आहे आणि मी त्याला फार महत्व देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, सुरू, देवदारू व भद्रदारू माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.