Isaiah 60:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील. हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल. पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील. मग तुला समजेल की तो मी आहे, जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे. तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे तू जाणशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.