Isaiah 60:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आता तुझ्याजवळ तांबे आहे, मी तुला सोने आणीन. आता तुझ्याजवळ लोखंड आहे, मी तुला चांदी आणून देईन. मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन. तुझ्या खडकांचे लोखंड करीन. मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन. आता लोक तुला दुखावतात, पण तेच तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुझ्यावर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने, तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन, लाकडाच्या ऐवजी कास्य, आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन. शांतता हे तुझ्यावरील अधिकारी, व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”