Isaiah 60:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत. आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.