Isaiah 60:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुला देतील. नबायोथचे मेंढे ते तुझ्याकडे आणतील. तू ती जनावरे माझ्या वेदीवर अर्पण करशील आणि मी त्यांचा स्वीकार करीन. मी माझे सुंदर मंदिर आणखी सुंदर करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.