Isaiah 61:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला ‘परमेश्वराचे याजक’, आमच्या देवाचे सेवक’ असे म्हटले जाईल. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्हाला मिळेल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हांला आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हांला प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल. राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल, व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल.