Isaiah 61:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे का घडेल? कारण मी परमेश्वर आहे आणि मला प्रामाणिकपणा आवडतो. मला चोरी व प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. म्हणून मी लोकांना योग्य तेच फळ देईन. मी माझ्या लोकांबरोबर कायमचा, करार केला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे; चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे. माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन.