Isaiah 62:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ऐका! परमेश्वर दूरवरच्या देशांशी बोलत आहे “सियोनच्या लोकांना सांगा, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्याचे कर्म त्याच्या समोर आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजवले आहे की, “सीयोनेच्या कन्येला म्हणा, ‘पाहा, तुझे तारण येत आहे; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे व पारिपत्य त्याच्यासमोर आहे.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहनी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत घोषणा केली आहे: “सीयोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझे उद्धारकर्ता येत आहेत! पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याकडे आहे, आणि त्यांची भरपाई त्यांच्यासोबत आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा! परमेश्वराने पृथ्वीच्या सीमेपर्यंत घोषीत केले आहे की, “सियोनेच्या कन्येला सांग, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्यांचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्यांचे प्रतिफळ त्याच्यापुढे आहे.”