Isaiah 62:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘देवाने त्याग केलेली माणसे’ असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही. तुमच्या भूमीला ‘देवाने नाश केलेली’ असे कोणी केव्हाही म्हणणार नाही. उलट, तुम्हाला ‘देवाची आवडती माणसे’ असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील. का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. पण हेफसीबा हे तुझे नवे नाव असेल आणि तुझ्या भूमीला बिऊला म्हणतील; कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, आणि तुझी भूमी विवाहित होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापुढे तुला “त्यागलेली” असे म्हणणार नाहीत, किंवा तुझ्या भूमीला “भयाण” असेही म्हणणार नाही. खरच तुला “माझा आनंद तिच्या ठायी आहे ” असे म्हणतील, आणि तुझ्या भूमीला “विवाहित ” म्हणतील. कारण परमेश्वराचा आनंद तुझ्यामध्ये आहे, आणि तुझी भूमी विवाहित होईल.