Isaiah 62:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने वचन दिले. परमेश्वराचे सामर्थ्य हाच त्या वचनाचा पुरावा आहे, व ते वचन पूर्ण करायला परमेश्वर आपले सामर्थ्य वापरील. परमेश्वर म्हणतो, “तुमचे अन्न आणि तुम्ही बनविलेले मद्य मी तुमच्या शत्रूंना पुन्हा देणार नाही, असे मी तुम्हाला वचन देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या उजव्या हाताने आणि त्यांच्या सामर्थ्यशाली भुजेने याहवेहने शपथ वाहिली आहे: “यापुढे मी कधीही तुझे धान्य, त्यांचे अन्न म्हणून तुझ्या शत्रूंच्या स्वाधीन करणार नाही, आणि तू परिश्रम करून काढलेला नवा द्राक्षारस, परकीय येऊन कधीही पिणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि सामर्थ्यवान बाहूची शपथ वाहीली आहे, खचित तुमचे धान्य मी तुझ्या शत्रूंना अन्न व्हायला देणार नाही.