Isaiah 63:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अदोमाहून हा कोण येत आहे? तो बस्राहून येतो. त्याची वस्त्रे लालभडक आहेत. तो त्या वस्त्रांत अत्यंत सुंदर दिसत आहे. तो त्याच्या सामर्थ्यामुळे ताठ मानेने चालत आहे. तो म्हणतो, “माझ्याजवळ तुम्हाला वाचवायचे सामर्थ्य आहे आणि मी सत्य बोलतो”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.