Isaiah 63:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी सभोवर पाहिले. पण मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मला मदत केली नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या लोकांना वाचविण्यासाठी माझे स्वत:चे सामर्थ्य वापरले. माझ्या स्वत:च्या रागाची मला मदत झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पाहिले पण कोणी साहाय्यकर्ता नव्हता; कोणाची अनुकूलता नव्हती म्हणून मी विस्मित झालो; तेव्हा माझ्याच बाहूने मला साहाय्य केले व माझ्या संतापाने मला आधार दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते, कोणी मदतीला नसल्यामुळे मला धक्का बसला; तेव्हा माझ्या स्वतःच्या बाहूने माझ्याकरिता मी उद्धार मिळविला, आणि माझ्या स्वतःच्या क्रोधाने मला राखले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले.