Isaiah 63:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल त्यांनी केलेल्या सर्व स्तुतिपात्र कृत्यांबद्दल सांगेन, जे सर्व याहवेहनी आमच्यासाठी केले— होय, ज्या अनेक गोष्टी त्यांच्या करुणेने व विपुल दयेने, त्यांनी इस्राएलसाठी केल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन. परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.