Isaiah 63:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना होणार्या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या सर्व दु:खात, तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.