Isaiah 66:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे लोक त्यांच्या खास बागांमध्ये पूजा करण्यासाठी शुचिर्भूत व्हावे म्हणून स्नान करतात. ते एकमेकांच्या मागून खास बागांमध्ये जातात. मग ते मूर्तीची पूजा करतात. पण परमेश्वर त्या सर्व लोकांचा नाश करील. “ते लोक डुक्कर, उंदीर ह्यांचे मांस व इतर घाणेरडया गोष्टी खातात. पण ह्या सर्व लोकांचा एकत्रितपणे नाश केला जाईल.” (परमेश्वराने स्वत: ह्या गोष्टी सांगितल्या)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बागेच्या मध्यभागी असलेल्या मूर्तीच्या मागे लागावे म्हणून जे आपणांस पवित्र व शुद्ध करतात व डुकराचे मांस, अमंगळ पदार्थ व उंदीर खातात ते सगळे एकदम विलयास जातील, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे स्वतःला पवित्र व शुद्ध करतात, ते बागेत जातील, मात्र जे डुकरे, उंदीर यासारखे इतर प्रकारचे निषिद्ध मांस खातात—अशा सर्व लोकांचा भयानक शेवट त्यांनी अनुसरलेल्या लोकांसह होईल,” अशी याहवेह घोषणा करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन, बागांच्यामध्ये झाडा खाली आपणाला पवित्र करतात आपणांस स्वच्छ करतात, ते एकत्र नाश होतील असे परमेश्वर म्हणतो.