Isaiah 66:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.