Isaiah 8:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोक “काय करावे ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे यांना विचारा” असे म्हणतात. (ते ज्योतिषी व जादूटोणा करणारे कुजबुजतात व आपल्याला गुपित समजते असे लोकांना वाटावे म्हणून पक्षांप्रमाणे बोलतात.) पण मी सांगतो की तुम्ही मदतीसाठी देवाला हाक मारावी. ते ज्योतिषी आणि जादूटोणा करणारे मृतांची मदत घेतात. सजीवांनी मृतांची मदत का घ्यावी?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?