Isaiah 8:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील.