Isaiah 9:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर पूर्वेकडून अरामी लोकांना व पश्चिमेकडून पलिष्ट्यांना आक्रमण करायला लावील. हे शत्रू आपल्या सैन्यबळावर इस्राएलचा पराभव करतील. पण एवढे झाले तरी परमेश्वराचा इस्राएलवरचा राग शांत होणार नाही. परमेश्वर लोकांना आणखी शिक्षा करण्याच्या विचारात असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.