Isaiah 9:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुकर्म हे ठिणगीसारखे असते. प्रथम, ते तण व काटेकुटे जाळते. नंतर रानातील झाडेझुडपे पेट घेतात आणि शेवटी त्याचा वणवा होऊन सगळेच त्याचे भक्ष्य होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते. ती काटेरी झुडपे आणि काटेरी झाडे यांना भस्म करते, ती झाडेझुडपांचे रान पेटवून टाकते, त्यामुळे तो धुराचा एक स्तंभ होऊन गरगर फिरत वर जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.