James 2:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, ‘सुखी राहा, कपड्यालत्याकडे व खाण्यापिण्याकडे लक्ष द्या’, पण जीवनावश्यक गोष्टी त्यांना तुम्ही देत नाही, तर त्याचा काय फायदा?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा;” पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, “शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा,” परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्‍या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ?