James 2:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि समजा चांगला पोशाख घालून आलेल्या मनुष्याला तुम्ही विशेष मानसन्मान दाखवूत त्याला म्हणाला, “येथे ज्या चांगल्या खुर्च्या आहेत त्यापैकी एखाद्या खुर्चीवर बसा.” आणि समजा तुम्ही त्या गरीब माणासाला म्हणाला, “तिकडे उभा राहा.” किंवा “माझ्या पायाजवळ बस.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही भपकेबाज कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पायांशी बस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा;” आणि दरिद्र्याला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस;”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तुम्ही ज्याने उंची कपडे परिधान केले आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देता आणि म्हणता, “ही जागा तुमच्यासाठी चांगली आहे,” परंतु त्या गरीब मनुष्याला म्हणता, “तिथे उभा राहा” किंवा “माझ्या पायाजवळ जमिनीवर बस,”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.”