James 2:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका! देवानेच जगाच्या दृष्टिकोनातून गरीब असले त्यांना विस्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले नाही काय, आणि जे त्याच्यावर प्रीति करतात त्यांना देवरोज्याचे वारस म्हणून निवडण्याचे अभिवचन दिले नाही का?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्या प्रिय बंधूनो, ऐका, ऐहिक दृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले, त्याचे वारस होण्यासाठी त्याने निवडले आहे की नाही?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?