James 2:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तुम्ही पवित्र शास्त्रातील महान आज्ञा “आपल्या शेजाऱ्ावर आपल्यासारखीच प्रीति करा” पाळता तर तुम्ही योग्य करता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात.