James 3:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या विश्वासू बंधूंनो, तुम्हातील पुष्कळांनी शिक्षक होऊ नये, कारण तुम्हाला माहीत आहे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला न्याय अधिक कठोरपणे होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे.