James 3:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.