James 3:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
किंवा तारू पाहा, ते एवढे मोठे असते व प्रचंड वाऱ्याने लोटले जात असते, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे तो अगदी लहानशा सुकाणूने ते फिरवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्‍याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्‍यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात.